सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खडकवासला धरण ओव्हरफ्लो!

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 25 हजारांच्यावर विसर्ग सोडण्यात येतोय त्यामुळे मुठा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jul 23 2021 8:28AM

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) तुडूंबं भरल्याने अवघ्या 7 तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग (Water discharge from Dam) 2400 क्युसेकवरून 25036 पर्यंत वाढवत न्यावा लागलाय. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या (Mutha River) रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगष्ट महिन्यात खडकवासला धरण 100 टक्के भरलं होतं यंदा मात्र तेच धरण 22 जुलैला 100 भरलं आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवस आधीच धरणातून पाणी सोडावं लागलंय.

 

खरंतर खडकवासला साखळी धरणातील चारही धरणं अजून भरलेली नाहीत उर्वरित तीन धरणात अजूनही 60 टक्केच जलसाठा आहे. पण साखळीत सगळ्यात शेवटी असलेल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसात प्रचंड पाऊस झाल्याने तुलनेनं छोटं म्हणजेच 3 टिएमसीचं धरण यंदा लवकर भरलं आणि काल संध्याकाळी पाच वाजेपासून या धरणातून सर्वप्रथम 2400 क्युसेकचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यात आला. पण तरीही धरणातील पाण्याचा येवा हा विसर्गापेक्षा कितीतरी जास्त असल्याने संध्याकाळी 7 वाजता हाच विसर्ग 5 हजार नंतर रात्री 8 वाजता 10 हजार आणि रात्री 11 वाजता हाच विसर्ग थेट 25 हजार क्यूसेक पर्यंत वाढवावा लागलाय. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहू लागणार आहे. म्हणूनच प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार