सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची प्रकृती आणखी खालावली

Pranav Mukherjee Health Update: मुखर्जी यांच्यावर मेंदूची शस्रक्रिया झाली होती. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती आणखीच खालावली आहे.

Aishwarya Dubey
  • Aug 13 2020 7:23PM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनकच असून मुखर्जी हे आता कोमात गेल्याची महिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांच्यावर मेंदूची शस्रक्रिया झाली होती. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती आणखीच खालावली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं खास पथक त्यांच्यावर उपचार करत असून उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत आज सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत होत्या. हॉस्पिटल आणि मुखर्जी यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचं खंडण करण्यात आलं आहे.

 

 

 

84 वर्षांच्या मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांची खास टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र कोविड आणि मेंदूच्या गाठीमुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार