सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक नंदुरबार एलसीबीची धडक कामगिरी

शहरातील श्री ज्वेलर्स येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातून अटक केली आहे.

Sudarshan MH
  • Sep 19 2022 8:23AM


नंदुरबार - शहरातील श्री ज्वेलर्स येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील श्री ज्वेलर्स येथे १४ वर्षांपूर्वी ८ जुन २००८ रोजी सकाळी कारने आलेल्या दरोडेखोरांनी रिव्हाॅल्वरने गोळी झाडून सराफाचे ५ लाख ९७ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने जबरीने चोरुन नेली होते.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रतापसिंग सुलतानसिंग सिकलीकर (रा.एकता नगर, नंदुरबार) गेल्या १४ वर्षांपासून फरार होता. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील व पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पाहिजे आरोपी,फरार,फेर अटक आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी फरार आरोपी प्रतापसिंग सुलतानसिंग सिकलीकर (रा.एकता नगर, नंदुरबार) यांच्या बाबत गुप्त माहिती काढून तो गुजरात मधील मांडवी येथे एका गॅरेजवर कामाला असल्याचे समजले.त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मांडवी येथे जाऊन शिताफीने आरोपीला पकडले. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार,उप विभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर,सपोनि अनिल गोसावी,पोना विशाल नागरे, सुनील पाडवी,बापु बागुल, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली. सदर कामगिरी बद्दल गुन्हा शाखेच्या पथकाचे अभिनंदन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार