सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिंचपाडा येथे घराच्या वादातून दोन गटांत आपसात मारहाण, १३ जणांविरुद्ध गुन्हा

आपसात मारहाण, १३ जणांविरुद्ध गुन्हा

Sudarshan MH
  • Aug 6 2022 8:51AM

नवापूर - घराच्या वादातून चिंचपाडा येथे दोन गटात आपसात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी  परस्परविरोधी फिर्यादीवरून १३जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचपाडा येथे जुन्या घराच्या वादातून भुपेंद्र रमेश गावीत,मनिषा भुपेंद्र गावीत, विवेक रमेश गावीत,अमित किशोर गावीत, हर्षल मनोज वळवी,दिपचंद सुरेश चौरे,आकाश नारायण मेना,दिपक कोकणी (सर्व रा.चिंचपाडा) यांनी सुजाता फुलसिंग वसावे (५४,रा.राहुल रेजन्सी, गडकरी चौक, नाशिक,हमु.चिंचपाडा), नितलसिंग फुलसिंग वसावे, सुरेखा बाई श्रीराम गावीत या तिघांना हाताबुक्याने मारहाण करून तलवरीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.दुसऱ्या घटनेत घराच्या वादातून श्रीराम नारायण गावीत, सुजाता फुलसिंग वसावे,नितलसिंग फुलसिंग वसावे, सुरेखा बाई श्रीराम गावीत, रमेश मकन धोडीया (सर्व रा.चिंचपाडा) यांनी भुपेंद्र रमेश गावीत व विवेक रमेश गावीत यांना काठीने व हाताने मारहाण करून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी सुजाता फुलसिंग वसावे व मनिषा भुपेंद्र गावीत यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार