सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विजेपासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता ;* *नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

Sudarshan MH
  • Jun 21 2022 4:22PM
*
नंदुरबार, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : पावसाच्या सरींसोबतच आकाशात होणा-या विजेच्या गडगडाटामुळे मानवाच्या मनात धडकी भरते. आकाशात काळे ढग, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असतांना योग्य दक्षता घेतली नाही तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रसंगी काय करावे आणि काय करू नये, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

काही लोक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ऐनवेळेला वादळात योग्य आसरा न मिळाल्याने मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. मेघगर्जना, वीज, वादळ होत असतांना काय करावे किंवा काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

*वज्राघात -काय करावे आणि काय करु नये*

वज्राघातापासून बचावासाठी आपल्या भागातील स्थानिक हवामानविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करावे. स्वत:साठी व कुटूंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क साधावा. आपत्कालीन साधने तयार ठेवावीत. जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर जाणे टाळावे. विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानूकुलीत यंत्रे बंद करावेत.आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे व फाद्या काढुन टाकाव्यात.

परिसरात वादळी वारे, विजा चकमत असल्यास घराबाहेर असाल तर त्वरीत आसरा शोधा.  इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत: कडे विजेला आकर्षित करतात. आसरा मिळाला नाही तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल यांच्यापासून दूर राहा. 

गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावा.जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल तर घरी जा. जेंव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी,  रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, टेलीफोन इत्यादी. पाण्यातून तात्काळ बाहेर या. बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा. धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्श करू नका. उंच एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही उपकरणाचा वापर करु नका. अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या वायरीपासून लांब राहा. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये.

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करु नये. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करु नये. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबू, शेड,उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये.  घरात असाल, तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
वीज पडली तर करावयाच्या उपाययोजना : आजूबाजूला अथवा एखाद्या व्यक्ती वर वीज पडली, तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बांधित व्यक्तीवर प्राथमिक उपचार करतांना या गोष्टींचा विचार करा. श्वासोच्छवास  थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल. ह्रदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा (छातीवर विशिष्ट पध्दतीने दाब देणे) उपयोग करावा. शरीरावर इतर काही जखमा, भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा ह्याबाबत नोंद करा. वरील सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार