सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती..

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून चार पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे.

Abhimanyu
  • Sep 16 2021 12:47PM
मुंबई: आंध्र प्रदेश सरकारने देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या नव्या बोर्डाची स्थापना केली आहे. यामध्ये एकूण २८ सदस्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीचाही समावेश आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीदेखील ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून चार पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. देशभरातून २४ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून मिलिंद नार्वेकरांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार