सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केळगाव प्रकरणातील खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा

जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व छावा आदी संघटणांचे पोलिस अधिक्षकांना निवेदन शेतीच्या वादातून निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लहू कांबळे व जोतिराम पाटील यांच्यात किरकोळ वाद झाला असताना लहू कांबळे यांनी स्वतःच दगडाने मारहान करून घेऊन स्वतःला जखमी करून घेतले त्याचा व्हिडीओ पण उपलब्ध आहे. जातीवाचक शिवीगाळ केली नसतानाही या प्रकरणाला वेगळे जातीय वळण देऊन अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला व याची पूर्ण शहानिशा न करता अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला

s.ranjankar
  • Jul 7 2021 3:37PM

लातूर: शेतीच्या वादातून निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लहू कांबळे व जोतिराम पाटील यांच्यात किरकोळ वाद झाला असताना लहू कांबळे यांनी स्वतःच दगडाने मारहान करून घेऊन स्वतःला जखमी करून घेतले त्याचा व्हिडीओ पण उपलब्ध आहे. जातीवाचक शिवीगाळ केली नसतानाही या प्रकरणाला वेगळे जातीय वळण देऊन अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला व याची पूर्ण शहानिशा न करता अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे सदरील कुंटुबावर अन्याय झालेलाआहे. त्यामुळे याबाबत पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून या प्रकरणाची सविस्तर शहानिशा करून तात्काळ अ‍ॅट्रॉसिटीच्याअंतर्गत दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विविध मराठा संघटणांच्यावतीने देण्यात आलेल्या निवदेनात केलेला आहे. या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष रंजना चव्हाण, जिल्हा सचिव समाधानताई माने, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनिल नावडे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष वैजनाथ दादा जाधव,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा बोराडेताई,  जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाउपाध्यक्षा मिराताई देशमुख ,छावाचे जिल्हाध्यक्ष शिध्दाजी जगताप  , मराठा सेवा संघाच्या जिल्हाउपाध्यक्षा आम्रपालीताई सुरवसे, सहसचिव अमरदीप गुंजोटे ,उत्तम शेळके ,संभाजी ब्रिगेडचे ता.उपाध्यक्ष भरत चव्हाण,रंडाळे सर, दिगोळे सर, माधव पाटील,पापालाल पाटील, गोविंद काळे, प्रशांत चव्हाण,सचिन पाटील, बळीराम चीचकोटे, सचिन पाटील, विक्रम चव्हाण, दत्ता काळे यांच्यासह असंख्य समाजबांधवाच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार