केळगाव प्रकरणातील खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा
जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व छावा आदी संघटणांचे पोलिस अधिक्षकांना निवेदन
शेतीच्या वादातून निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लहू कांबळे व जोतिराम पाटील यांच्यात किरकोळ वाद झाला असताना लहू कांबळे यांनी स्वतःच दगडाने मारहान करून घेऊन स्वतःला जखमी करून घेतले त्याचा व्हिडीओ पण उपलब्ध आहे. जातीवाचक शिवीगाळ केली नसतानाही या प्रकरणाला वेगळे जातीय वळण देऊन अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला व याची पूर्ण शहानिशा न करता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला