सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना आणि युवा सेनच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन आणि समारोप

तालुक्यातील हजाराहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

Vashim. MH
  • Jan 24 2021 9:04PM
 
 
*शिबिरात पाच हजार रुग्णांची तपासणीही करण्यात डॉक्टरांना यश*
 
  शिवसेनेचे प्रथम पक्ष प्रमुख आणि संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरुळपीर शहरात रोगनिदान शिबिराचे आयोजन नगर परिषद काँम्पल्याक्स येथे करण्यातआले.
  स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना व युवासेना मंगरुळपीर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 शनिवारी एक विशाल आणि भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात सर्व रोगांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही या शिबिरात प्रामुख्याने सहभाग नोंदवला. ऑर्थोपेडिक, नेत्ररोग तज्ज्ञ, नाक कान घशातील तज्ञ, बालरोग तज्ञ, प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ, त्वचा (त्वचा) तज्ञ, सामान्य शस्त्रक्रिया तज्ञ, हृदय व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्य विषयी माहिती देऊन जनजागृती केली. देशावरील संकट असो की कोरोना हे आपल्या देशातील योध्दे सर्व प्रथम सेवे साठी अग्रेसर असतात.तसेच डॉक्टरांनी नेत्र तपासणी करुन संबंधीत वयोवृद्ध रूग्णांना चश्मे वाटप केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे नगराध्यक्षा डॉ. गजाला मारूफ खान, माजी नगराध्यक्ष चंदू परळीकर माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर यांच्या विशेष उपस्थितीवर पूर्ण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते विवेक नाकाडे,वहिद सौदागर, सुनिल कुर्वे,भास्कर मुळे ग्यानु भडागे,बाळासाहेब हवा,संदिप हरीहर छोटु सौदागर आणि सचिन परळीकर आदिनी प्रयत्न केले. 
 तालुक्यातील गोरगरीब जनतेला न्याय देण्यात तालुका शिवसेना अग्रेसर राहील असे शहर प्रमुख सचिन परळीकर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचलन बाळासाहेब हवा आणिआभार प्रदर्शन भास्कर मुळे यांनी केले. आणि शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांच्या ऊपस्थीतीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार