सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधी पक्ष निर्णय घेईल : शरद पवार

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना पवारांनी सांगितलं की

Snehal Joshi .
  • Jan 14 2021 10:21PM
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानं ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शरद पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल,धनंजय मुंडेंनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सर्व माहिती दिल्याचं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे मला काल भेटले आणि आरोपाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार काही व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच या तक्रारी तयार झाल्या आहेत. याबाबत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी असल्याचं पवारांनी सांगितलं.धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना पवारांनी सांगितलं की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही पवारांनी सांगितलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार