सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत आहे - रोहित पवार

भाजप कुठल्याही शब्दाचं राजकारण करते...

Aishwarya Dubey
  • Jul 31 2020 6:30PM

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेद हळूहळू चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भाजप सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबतही सध्या तर्कवितर्क मांडले जात आहे.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल का? यावर राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, सर्वसामाजाला बरोबर घेऊन जाण्याची पवार साहेबांची भूमिका असते. भाजप कुठल्याही शब्दाचं राजकारण करत असते. सरकारमध्ये ताळमेळ नाही, अशी टीका विरोधक करत आहे. मात्र, सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास आहे. तसेच

शब्दांचं राजकारण करून कुणाचेही पोट भरणार नाही, असेही पवार यांनी यांनी यावेळी सांगितलं. अहमदनगरमध्ये रोहित पवार यांच्या ट्रस्टच्या वतीने शासकीय रुग्णालयात रेमडीशिवर हे औषध आणि सेनिटायझर वाटप करण्यात आलं.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'

दुसरीकडे, राज्यावर कोरोनाचं संकट असताना त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका केली जात आहे. या तीन चाकी सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर खोचर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप' असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहीनीच्या एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे आपल्याला दाखवले जात आहे. मात्र, खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. या प्रकारचं तीन चाकी सरकार यापूर्वी कधीही चालेलं नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणत असले तरीही काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार