सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यामातून जनतेला संबोधित केलं आहे

बुद्धपौर्णिमेनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे.

Sudarshan MH
  • May 7 2020 10:20AM

नवी दिल्ली, 07 मे : बुद्धपौर्णिमेनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या पूजा आणि समारंभांचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या पाहता येणार आहे. वेळ, काळ आणि स्थिती बदलली तरीही गौतम बुद्धांनी दिलेला संदेश कायम प्रवाही आहे. संघटनात्मक भावनेतून आपण या महासंकटावर मात करू शकतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

गौतम बुद्धांचे संदेश आणि त्यांची शिकवणीचं महत्त्व पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

कोरोनाच्या महासंकटात अनेक लोक 24 तास सेवा देत आहेत

जेवढं शक्य आहे तेवढा मदतीचा हात पुढे करायला हवा.

जगभरात ज्या देशांना भारताची गरज पडली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलं.

आपलं काम निरंतर सेवा भावनेतून असावं ही भावाना कायम आपल्या मनात ठेवायला हवी.

सगळ्यांना मदत करण्यासाठी भारत कायम तयार आहे.

बुद्ध मानवतेचं दर्शन करतात

कोरोनाच्या महासंकटा सापडलेल्या व्यक्तींच्या पाठिशी आपण उभे आहोत असा मला विश्वास आहे.

शक्य असेल तेवढी मदत करा. मदतीचा हात पुढे करा.

जगात विसकीत देश असलेला भारत हा सर्वांच्या मदतीसाठी कायम तत्पर असेल.

या कठीण काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्हाला खऱ्या अर्थान सलाम.

माणसाला नेहमी मदत करणारे खरे भगवान गौतम बुद्धांचे खरे शिष्य आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार