सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'फाळणीची वेदना कधीही विसरणे शक्य नाही',- पंतप्रधान नरेंद्र मोदी

14 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी फाळणीच्या कटू आठवणीनं भावुक झाले आहेत.

Sudarshan MH
  • Aug 14 2021 12:51PM

 भारताच्या फाळणीचा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट. याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी  होऊन पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह विस्थापित व्हावं लागलं. फाळणीच्या या कटू आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी  चांगलेच भावुक झाले आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस'  म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे की, 'देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावं लागलं. अनेकांनी जीव गमावला. त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस  विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल.'

 

ब्रिटीशांनी 1947साली भारत सोडताना देशाची फाळणी केली. मुस्लीम बहुल पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन झाले. त्या घटनेच्या वेदना आजही जिवंत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार