सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Unlock 1 नंतर कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक

24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे

Aishwarya Dubey
  • Jun 12 2020 11:21AM

देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Unlock 1 च्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात नवीन 10 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

24 तासांत देशात 10 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा 2, 97,535 हजारवर पोहोचला आहे. 24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे. तर 1, 47, 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास 49.47 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकाडा आतापर्यंत 97 हजार 648 वर पोहोचला आहे. त्यापैकी 46 हजार 78 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. त्याखालोखाल तमिळनाडू, गुजरात, दिल्ली राज्यांचा समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार