सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे -- नारायण राणे

काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्व नाही. काँग्रेसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, अशी टीका नारायण राणे यांची आहे.

Snehal Joshi .
  • Aug 24 2020 9:13PM
राष्ट्रीय अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे आज हवं तसं नेतृत्व नाही. काँग्रेसची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे, अशी टीका करतानाच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला नेते कंटाळले आहेत. त्यामुळेच पत्रं पाठवून नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक सुरू आहे. पण अद्यापही कुणाच्याच नावावर एकमत होताना दिसत नाही. राहुल गांधीही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार नाहीत आणि दुसऱ्या नावाची कोणी शिफारस करतानाही दिसत नाही, असं सांगतानाच आज देशात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत कठिण आहे. आज हवं तसं नेतृत्व काँग्रेसकडे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एकमत होणं कठीण आहे, असं नारायण राणे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार