सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

1 जूनपासून बदलणार रेशन कार्ड संबंधित अनेक नियम

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असणारी रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा 'एक राष्ट्र-एक रेशन कार्ड' 1 जून 2020 पासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अमलांत आणली जाणार आहे

Aishwarya Dubey
  • May 30 2020 2:48PM

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असणारी रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा 'एक राष्ट्र-एक रेशन कार्ड' 1 जून 2020 पासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अमलांत आणली जाणार आहे. वन नेशन, वन राशन कार्ड योजना (One Nation, One Ration Card) सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाची योजना ठरू शकते. सुप्रीम कोर्टाने देखील ही योजना राबवण्यावर विचार करण्याचे केंद्र सरकारला सांगितले होते. जेणेकरून कोरोना व्हायरस (Coronavirus) पँडेमिकमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान कामगार आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळेल.

केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी अशी माहिती दिली आहे की, या योजनेअंतर्गत 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे.त्याच प्रमाणे याकरता ओडिशा, मिझोरम आणि नागालँड ही 3 राज्य देखील तयार होत आहेत. एकूण 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेच्या शुभारंभासाठी सज्ज असणार आहेत. 

आधार कार्डच्या माध्यमातून होणार ओळख

या योजनेअंतर्गत पीडीएसच्या लाभार्थ्यांची ओळख त्यांच्या आधार कार्डवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (PoS) डिव्हाइसवरून करण्यात येईल. या योजनेची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी करण्यासाठी पीडीएस दुकानांमध्ये पीओएस मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. जसजसे देशातील राज्य दुकानांमध्ये 100 टक्के पीओएस मशिन्स बसवण्यासंदर्भात रिपोर्ट देतील, तसतसे त्यांना या योजनेमध्ये सामावून घेतले जाईल.

ही योजना लागू झाल्यानंतर लाभार्थी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही रेशन डीलरकडून त्यांच्या कार्डवर रेशन घेऊ शकतात.

याकरता त्यांना जुने रेशन कार्ड सरेंडर करण्याची किंवा नवीन जागी रेशन कार्ड बनवून घेण्याची आवश्यकता नाही. मानक रेशन कार्ड दोन भाषांमध्ये जारी करा, एक स्थानिक आणि दुसरी इंग्रजी किंवा हिंदी. भारतातील कोणताही कायदेशीर नागरिक या रेशन कार्डासाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचे नाव आई-वडिलांच्या रेशन कार्डावर जोडण्यात येईल. या रेशन कार्ड धारकांना 5 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने तर गहू 2 रुपये किलो दराने मिळेल.

रेशन कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?

-सर्वात आधी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा

-इथे तुमची भाषा निवडा

-त्यानंतर काही वैयक्तिक माहिती- जिल्ह्याचे नाव, परिसराचे नाव, ग्रामपंचायत इ. द्यावी लागेल

-त्यानंतर तुम्हाला कार्डचा प्रकार (APL/BPL/Antodaya) निवडावा लागेल

-यापुढे तुम्हाला घरातील प्रमुखाचे नाव, आधार कार्ड नंबर, मतदान ओळखपत्र, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक इ. ही माहिती विचारली जाईल

-सर्व माहिती दिल्यानंतर शेवटी सबमिट बटणवर क्लिक करा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार