सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरू होतील : अमित देशमुख

राज्यातील करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन परीक्षेचे नियोजन केले जात आहे.

Aishwarya Dubey
  • Jun 5 2020 7:16PM

राज्यातील करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन परीक्षेचे नियोजन केले जात असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरू होतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच वैद्यकीय विभागाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेनुसार सुरू करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वैद्यकीयशिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला आणि अनेक विषयावर भाष्य केले. देशमुख म्हणाले, “राज्यात एका बाजूला करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या देखील अधिक प्रमाणात आहे. हे दिलासादायक चित्र आहे. या परिस्थितीत  मृत्यू दर कशा प्रकारे कमी करता येईल, याकडे सरकारचे लक्ष आहे.”

आरोग्य विभागातील पदभरतीसाठी मंजुरी

“राज्यातील अनेक भागात डॉक्टर्स, नर्स युद्ध पातळीवर काम करीत आहेत. त्या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स किंवा आरोग्य विभागातील जी काही पदे रिक्त असतील. ती भरण्यासाठी मंजूरी देण्यात आली असून त्या संदर्भातील कार्यवाहीस सुरुवात झाली आहे,” असेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही करोना चाचणीचे दर निम्म्यावर आणणार

पुण्यात करोना टेस्ट करण्यासाठी साडेचार हजारांहून अधिक दर खासगी लॅब आकारतात. याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अमित देशमुख म्हणाले, “राज्य शासनाने मुंबईत दोन हजार रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील निम्म्यावर दर आकारले जावेत, याबाबत सरकार निर्णय घेईल.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें