सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याला अखेर हिरवा कंदिल

जमीन मालकांशी समझोता; मनपा प्रशासनाकडून काम सुरू

Deepak Chauhan
  • Jun 15 2020 1:58PM
पिंपरी  ।  प्रतिनिधी
भोसरीतून  आळंदी रस्त्याने प्रवास करण्यासाठी आता वाहनचालक- नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरी बायपास रोडचे काम हाती घेतले असून, जमीन मालक (शेतकरी) आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक समझोता करुन आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार रस्त्याचे काम सुरुही झाले आहे. 
आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, सागर गवळी, भीमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोसरी- आळंदी रस्ता म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील ‘लक्ष्मीरोड’ आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात व्यावसायिक आहेत. भोसरीतील व्यापार विश्वाची ‘हर्टलाईन’ म्हणून या परिसराची ओळख आहे. भाजी मंडई, दोन गार्डन, मंगल कार्यालये, दोन पेट्रोलपंप या रस्त्यावर आहेत. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता होती. 


पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना १९८६ मध्ये झाली. तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवड नगरपालिका होती. गेल्या ३० वर्षांपासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. प्रत्येक निवडणुकांमध्ये राजकीय व्यक्तींनी भोसरी वाहतूक कोंडीमुक्त आणि बायपास करणार अशी आश्वासने तत्कालीन पुढाऱ्यांनी दिले. मात्र, रस्ता कधीही अस्तित्वात आला नाही, अशी खंत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये होती.


दरम्यान, महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेनंतर (२०१७) भोसरी विधानसभा मतदार संघात अंतर्गत रस्ते आणि बाह्य रस्त्यांचे जाळे निर्माण करुन समाविष्ट गावाची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. वास्तविक, भोसरी बायपास रस्ता विकास आराखड्यामध्ये (डीपी) समाविष्ट नाही. परंतु, नागरिकांच्या हितासाठी हा रस्ता करणे आवश्यक होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार