सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एक महिन्याच्या बालिकेचा करोनाने मृत्यू?

वसई-विरार शहर महापालिकेच्या वसईतील रुग्णालयात जन्मलेल्या एक महिन्याच्या बालिकेचा नालासोपारातील करोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात मृत्यू झाला असून तिच्या मृत्यू दाखल्यावर ‘करोना संशयित’ अशी नोंद करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Aishwarya Dubey
  • May 19 2020 11:00AM

वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या वसईतील रुग्णालयात जन्मलेल्या एक महिन्याच्या बालिकेचा नालासोपारातील करोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात मृत्यू झाला असून तिच्या मृत्यू दाखल्यावर ‘करोना संशयित’ अशी नोंद करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वसईच्या पश्चिमेकडील वसई कोळीवाडा परिसरातील एका महिलेची ९ एप्रिल रोजी वसई-विरार शहर महापालिकेच्या सर डी. एम. पेटिट या वसईतील रुग्णालयात प्रसूती झाली होती. या महिलेने मुलीला जन्म दिला होता. या नवजात बालिकेला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे १६ मे रोजी तिला पुन्हा सर डी. एम. पेटिट रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिच्यात करोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या सल्लय़ानुसार कुटुंबीयांनी या बालिकेला नालासोपारातील रिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले. सोमवारी पहाटे या बालिकेचा मृत्यू झाला. या बालिकेच्या मृत्यू दाखल्यावर ‘कोरोना संशयित’ अशी नोंद करण्यात आली आहे.

बंद रुग्णालय पुन्हा सुरू

दरम्यान, सर डी. एम. पेटिट रुग्णालयात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे १४ एप्रिलपासून काही दिवस हे रुग्णालय निर्जंतुकीकरणासाठी बंद करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांबाबत नागरिकांनी काळजी व्यक्त केली होती. काही दिवसांनी हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले.

कोळीवाडय़ात धारावीची पुनरावृत्ती

या बालिकेच्या मृत्यूनिमित्ताने पुन्हा एकदा पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे. ही बालिका करोना संशयित असेल तर ती काही काळ सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल होती, हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय याआधीही या रुग्णालयात करोना रुग्ण सापडल्यानंतर आम्ही रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली होती. याशिवाय या बालिकेचे कुटुंबीय राहत असलेला वसई कोळीवाडय़ातील बराच परिसर झोपडपट्टीचा आहे. या परिसरात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील अनेक जण राहतात. त्यामुळे सामाजिक दुरीकरणाच्या अनुषंगाने तसेच करोनाचा प्रादुर्भाव होऊ  नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत इथे साशंकताच आहे. या भागात करोनाचा उद्रेक झाल्यास या भागात मुंबईतील धारावीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या भागातील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ नूर शेख यांनी व्यक्त केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार