सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांसमोर झाले हजर, म्हणाले.....

कोर्टाने दिलेल्या आदेश आणि अटीनुसार, अखेर आज नारायण राणे हे अलिबाग पोलीस स्टेशनला हजर झाले होते.

Sudarshan MH
  • Sep 14 2021 10:11AM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने दिलेल्या आदेश आणि अटीनुसार, अखेर आज नारायण राणे हे अलिबाग पोलीस स्टेशनला हजर झाले होते. मागील वेळी राणे येऊ शकले नव्हते, पण यावेळी त्यांना हजर व्हावे लागले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्ट रोजी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन त्यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी संगमेश्वर येथून ताब्यात घेतलं होतं. 24 तारखेला त्यांना अटक झाली होती. त्यानंतर महाड दिवाणी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना काही अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला होता. परंतु, या अटी शर्तीचे पालन करून नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजर झाले.

पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  'मी पोलीस स्टेशनला आलो. न्यायालयाने जो आदेश दिला होता, त्याचे पालन करून आलो आहे.  आदेशाप्रमाणे कोणताही जबाब नोंदवला नाही. रायगड पोलिसांनी सहकार्य केले. अलिबागचे जेवण सुद्धा चांगले होते, असं राणे म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार