सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

LPG Gas Cylinder Price: ग्राहकांना झटका!

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

Sudarshan MH
  • Feb 4 2021 10:29AM

एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4 फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 6 रुपयांची घट करण्यात आली आहे.

काय आहेत नवे दर?

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी बजेट असल्याने त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. जानेवारी महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. मात्र फेब्रुवारीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने किंमती वाढल्याने ग्राहकांसाठी हा झटका मानला जात आहे. जानेवारीमध्ये कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या होत्या.

तुमच्या शहरात 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचे काय आहेत दर?

नवी दिल्ली- 719 रुपये

मुंबई- 719 रुपये

चेन्नई- 735 रुपये

कोलकाता- 745.50 रुपये

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार