सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य रवाना

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडून चिपळूणकडे जाणाऱ्या ट्रकला हिरवा झेंडा चिपळूण येथील पूरग्रस्तांना लातूरांकडून स्नेहाची शिदोरी

S.n.ranjankar
  • Jul 28 2021 7:32PM


लातूर, दि.28 रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी होऊन निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे प्रापंचिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून लातूर जिल्हावासियांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, संघटना, बँका, शिक्षण संस्था व  जिल्ह्याच्या प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी या पूरग्रस्तांसाठी कर्तव्य भावनेतून मदत केली असून हे सर्व जीवनावश्यक साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून दोन ट्रक मधून चिपळूणकडे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
       यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने, सहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
        जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील नागरिकांना चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याबाबत आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला लातूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन जीवनावश्यक वस्तूंचे 700 किट तयार झाले. यामध्ये गहू पीठ दहा किलो, तांदूळ पाच किलो, तेल दोन किलो, तूर डाळ दोन किलो, मिरची पावडर पाव किलो, अंगाचे साबण तीन, कपड्याचे साबण तीन, जिरे-मोहरी प्रत्येकी 50 ग्रॅम, रवा दोन किलो, चहा पावडर अर्धा किलो व कांदा बटाटे पाच किलो या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
       तर इतर साहित्याचे पाचशे किट पाठविण्यात आले असून यामध्ये सतरंजी, चादर, टॉवेल, साडी, सॅनेटरी नॅपकिन पॅड, पॅन्ट, बरमुडा व अंतर्वस्त्र आदींचा समावेश आहे. तसेच बॉटल बंद पाण्याचे 500 बॉक्स पाठवण्यात आले असून प्रत्येक बॉक्समध्ये 12 बॉटल आहेत. तसेच 300 ब्लॅंकेट, 2000 मास्क व तांदळाचे पंचवीस किलोचे बारा नग असे साहित्य दोन ट्रक च्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आलेले असून या साहित्ययया सोबत मदत कक्षाचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई गेलेले आहेत.
         हे साहित्य उद्या चिपळूणमध्ये पोहोचणार असून लातूरकरांच्या स्नेहाची शिदोरी पूरग्रस्तांना मायेची ऊब देणारी ठरेल.

बातमीसाठी संपर्क-
श्रीकांत रांजणकर
जिल्हा प्रतिनिधी
9834706034

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार