सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

LIC ची पॉलिसी, 121 रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी 27 लाख मिळतील

LIC Policy: तुम्हाला देखील मुलगी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू इच्छित आहात तर LIC ची ही पॉलिसी तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Sudarshan MH
  • Feb 4 2021 10:22AM

मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या जन्मावेळीच गुंतवणूक करण्याला अनेकजण पसंती देतात. आम्ही तुम्हाला LIC ची अशी एक पॉलिसी सांगणार आहोत, जी मुलीच्या लग्नासाठी खास बनवण्यात आली आहे. LIC च्या या पॉलिसीचं नावही साजेसं आहे- LIC कन्यादान पॉलिसी . या योजनेमध्ये दररोज 121 रुपयांची बचत अर्थात मासिक 3600 रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. यापेक्षी कमी किंवा यापेक्षा जास्त किंमतीचा प्रीमियमही तुम्ही खरेदी करू शकता.

121 रुपयांच्या हिशोबाने तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर 25 वर्षानंतर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमयम भरावा लागणार नाही, वार्षिक 1 लाख रुपये मिळतील. याशिवाय 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपयेही मिळतील.

ही पॉलीसी खरेदी करणाऱ्याचे वय कमीतकमी 30 वर्षे तर मुलीचं वय 1 वर्षं असणं  आवश्यक आहे. ही योजना 25 वर्षाची असली तरी, प्रीमियम 22 वर्षांसाठी द्यावा लागेल. मात्र तुमच्या मुलीच्या वयाच्या  मानाने वेगवेगळ्या पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीचा कालावधी निश्चित केला जातो.

काय आहेत महत्त्वाचे मुद्दे?

-25 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते पॉलिसी

-22 वर्षांपर्यंत द्यावा लागेल प्रीमियम

-दररोज  121 रुपये बचत करून महिना 3600 रुपयांचा प्रीमियम भरता येईल

-वीमाधारकाचा मध्येच मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना पैसे भरावे लागणार नाहीत

-मुलीला पॉलिसीच्या शिल्लक वर्षापर्यंत प्रति वर्षाला मिळतील 1 लाख

-पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळतील 27 लाख रुपये

-यापेक्षा  कमी किंवा जास्त प्रीमियमवर पॉलिसी खरेदी करता येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार