सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभिनेत्री कंगना रणौतने ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील पहिल्या दिवसाचा अनुभव शेअर केला

कंगनाने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Aishwarya Dubey
  • Aug 25 2020 10:36AM

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून अभिनेत्री कंगना रणौतने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केलं. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला. अलिकडेच कंगनाने डिजिटल डेब्यु केला असून तिने ‘मणिकर्णिका’च्या सेटवरील पहिल्या दिवसाचा अनुभव शेअर केला आहे.

कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या दोन्ही भुवयांमध्ये जखम झाल्याचं दिसून येत आहे. ही जखम ‘मणिकर्णिका’च्या सेटवर पहिल्याच दिवशी झाल्याचं कंगनाने सांगितलं.

 

“मणिकर्णिकाच्या चित्रीकरणाचा पहिला दिवस. तलवारबाजीचा एक महिने सराव केला होता. मात्र पहिल्याच सीनमध्ये सहकलाकाराकडून जवळपास १ किलोची तलवार माझ्या डोक्याला लागली. त्यावर लक्ष्मीबाईंनी मला पेशव्यांचा टिळा लावला आहे. त्यामुळे हा कायम माझ्या चेहऱ्यावर चमकत राहिलं,असं मी म्हटलं होतं”, अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.

दरम्यान, कंगनाने ट्विटरवर पदार्पण केल्यापासून ती सतत अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ती सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तसंच मध्यंतरी तिने करण जोहर, महेश भट्ट यांच्यावर घराणेशाहीचे आरोप कले होते.त्यामुळे सध्या ती विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार