सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Gold Silver Price: आजचे नवे दर

देशात आज सोन्याचांदीचे दर वधारल्याचे (Gold Silver Prices Raised) पाहायला मिळते आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 224 रुपये प्रति तोळाने वाढून 52,672 रुपये झाले आहेत.

Aishwarya Dubey
  • Sep 19 2020 8:58AM

देशात आज सोन्याचांदीचे दर वधारल्याचे (Gold Silver Prices Raised) पाहायला मिळते आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोन्याचे दर 224 रुपये प्रति तोळाने वाढून 52,672 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीत प्रति किलो 620 रुपयांची तेजी आली आहे. यानंतर चांदीचे दर 69,841 रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुवारी सोन्याचांदीचे भाव घसरले होते. गुरुवारी चांदीचे दर 1,214 रुपये प्रति किलोग्रामने उतरले होते.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 18th September 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते सोन्याचे भाव आज 224 रुपयांनी वाढून 52,672 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधी गुरुवारी सोन्याचे भाव 608 रुपयांनी घसरले होते. गुरुवारी सोन्याचे दर 52,463 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,954 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price on 18th September 2020)

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते आज चांदीचे भाव 620 रुपये प्रति किलोने वाढून 69,841 रुपये प्रति किलोग्रामवर आली आहे. गुरुवारी चांदीचे दर 1,214 रुपये प्रति किलोने कमी झाले होते. त्यानंतर 69,242 रुपये प्रति किलोग्रामवर चांदीचे दर बंद झाले होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 27.13 डॉलर प्रति औंस आहेत.

का वाढले सोन्याचांदीचे दर?

एचडीएफसी सिक्योरिटीज के वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल  यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार