सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Mirzapur 2: सगळे आहेत करोडपती! वाचा कुणाकडे किती आहे संपत्ती

मिर्झापूर 2 च्या भाषेत बोलायचं झालं तर हा सीझन देखील 'भौकाल' आहे. सोशल मीडिया वर या वेब सीरीजची खूप चर्चा होत आहे

Aishwarya Dubey
  • Oct 31 2020 12:03PM

Amazon Prime ची सुपरहिट सीरिज असणाऱ्या मिर्झापूरचा दुसरा सीझन (Mirzapur-2) 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पुन्हा एकदा कालीन भैया, मुन्ना भैया, बिना त्रिपाठी, गोलू गुप्ता, मौर्या साहब, डिंपी या सर्वांनीच धमाकेदार अभिनय केला आहे. या सीरिजच्या भाषेत बोलायचं झालं तर, या सीझनमध्ये देखील 'भौकाल' पाहायला मिळाला आहे. काही नवीन कलाकार देखील यावेळी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांवर अधिराज्य करणाऱ्या या सर्व कलाकार मंडळींची संपत्तीत किती आहे, हे जाणून घेऊया.

कालीन भैया अर्थात पंकज त्रिपाठी यांनी गेल्या दशकात विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांची प्रत्येक भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा काकणभर श्रेष्ठ असते. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'स्त्री', 'न्यूटन', 'मसान', 'गुंजन सक्सेना' हे पंकज यांचे काही गाजलेले चित्रपट. मिर्झापूरव्यतिरिक्त सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये देखील त्यांनी कमाल अभिनय केला आहे. दरम्यान मीडिया अहवालानुसार पंकज यांची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे.

किंग ऑफ मिर्झापूर मुन्ना त्रिपाठीची दमदार भूमिका दिव्येंदू शर्मा या अभिनेत्याने केली आहे. याआधी तो 'प्यार का पंचनामा', 'बत्ती गुल मीटर चालू', 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमात देखील दिसला आहे. 37 वर्षीय दिव्येंदूची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये इतकी आहे.

अली फजल अर्थात गुड्डू भैयाची नेटवर्थ 23 कोटी इतकी आहे. केवळ बॉलिवूड किंवा वेब सीरिजच नाही तर अलीने हॉलिवूडमध्ये देखील त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

श्वेता त्रिपाठी अर्थात मिर्झापूरमधील गोलू उर्फ गजगामिनी गुप्ता हिची नेटवर्थ एकूण 8 कोटी आहे. तिची 'मसान'मधील भूमिका सर्वोत्तम अभिनयांपैकी आहे. 'हरामखोर' या सिनेमात तिने नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या मुरलेल्या कलाकाराबरोबर स्क्रीन शेअर केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार