सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Happy Birthday Nana Patekar: स्टारडम मिळवूनदेखील नाना पाटेकर यांचं राहणीमान अतिशय साधं

नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. एवढं स्टारडम मिळवूनदेखील नाना पाटेकर यांचं राहणीमान अतिशय साधं सरळ आहे.

Sudarshan MH
  • Jan 1 2021 1:08PM

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यात झाला होता. नाना पाटेकर यांनी 4 दशकं बॉलिवूडवर राज्य गाजवलं आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची देशातच नाही तर जगभरातही ओळख आहे.

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यात झाला होता. नाना पाटेकर यांनी 4 दशकं बॉलिवूडवर राज्य गाजवलं आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची देशातच नाही तर जगभरातही ओळख आहे.

अतिशय यशस्वी अभिनेता असूननी नाना पाटेकर साधं सरळ आयुष्य जगतात. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पाटेकरांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून नाम ही संस्था सुरू केली आहे. आजपर्यंत अनेकांना या संस्थेद्वारे मदत मिळाली आहे.करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाना पाटेकरांनी गमन नावाच्या एका सिनेमातून एका छोट्याच्या भूमिकेतून करिअरची सुरूवात केली होती.त्यांना खरी ओळखी एन चंद्रा यांच्या अंकुश आणि विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा सिनेमामुळे मिळाली होती. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला क्रांतीवीर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी 'यशवंत', 'वजूद', 'युगपुरुष', 'गुलाम-ए-मुस्तफा' सारख्या अनेक भूमिकांमध्ये हिरोची भूमिका साकारली. 'खामोशी', 'यशवंत', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'वेलकम' आणि 'राजनीति' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

नाना पाटेकर यांना डायलॉग डिलीव्हरीचा ‘दादा’ म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. उत्कृष्ट संवाद फेक आणि उत्तम अभिनयामुळे आजही नाना पाटेकर रसिकांच्या मनात घर करुन आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार