सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिशा पाटनीनं आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला दिशानं ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्यानं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 13 2020 1:07PM

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज 28 वा वाढदिवस आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आजच आहे. मागच्या वर्षभरात दिशा आणि आदित्य यांच्या नावाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. दरम्यान आज आदित्य यांच्या वाढदिवसाला दिशानं ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्यानं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

दिशा पाटनीनं आदित्य ठाकरे यांना ट्विटरवनरून शुभेच्छा दिल्या. तिनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा...’ यासोबत दिशानं स्माइली आणि हार्टवाला इमोजी सुद्धा पोस्ट केला आहे. दिशाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर आदित्य आणि दिशाच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

 

मागच्या वर्षी एका डिनर डेटनंतर दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांना एकत्र स्पॉट केलं गेलं होतं आणि त्यानंतर या दोघांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर एका मुलखातीत दिशानं आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही शुभेच्छा दिल्या होत्या.

याशिवाय काही महिन्यांपूर्वी संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला होता. ज्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली होती. यावेळी अवधूत गुप्तेंनी दिशाचं नाव न घेता आदित्य ठाकरेंची फिरकी घेतली होती. मात्र आदित्यनं तुमची दिशा चुकतेय असं म्हणत त्यांना धम्माल उत्तरही दिलं होतं. या मुलखतीतला हा किस्सा खूप गाजला होता

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार