सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

CBSC दहावी, बारावीची परीक्षा 1 जुलैपासून

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा एक ते 15 जुलै च्या दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. ट्विटरवर एक

Sudarshan MH
  • May 9 2020 2:23PM

9 May 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा एक ते 15 जुलै च्या दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. मार्च महिन्यात कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉक डाऊन जारी केले. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. 


जवळपास 90 विषयांची परीक्षा शिल्लक असताना फक्त 29 मुख्य विषयांची परीक्षा लॉक डाऊन नंतर होईल असे सीबीएसई एप्रिलमध्ये घोषित केले होते. तर ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीचे विद्यार्थी काही विषयांची परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा होणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांची भूगोल, हिंदी, बिझनेस स्टडी,  होम सायन्स,  समाजशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या विषयाची परीक्षा होणार आहे. असं त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार