सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा 2020 च्या जून दरम्यान होणार होता

Aishwarya Dubey
  • Jun 11 2020 6:56PM

कोरोनामुळे भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा 2020 च्या जून दरम्यान होणार होता. पण तो आता होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. देशात सुरू असलेल्या कोव्हिड-19च्या असलेल्या साथीच्या रोगामुळे 3 एकदिवसीय सामने आणि 3 T20 सामने होऊ शकणार नसल्याचं बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेटला (SLC) सांगितलं आहे.

कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट संघाची आणखी एक मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. या महिन्यात टीम इंडिया श्रीलंका दौर्‍यावर जाणार होती, पण कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका होती पण ती आता रद्द झाली आहे.

टीम इंडिया 24 जून ते 11 जुलै दरम्यान श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळणार होती, पण कोरोना विषाणूमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे अजूनही बीसीसीआय सामने खेळणार अशी अपेक्षा श्रीलंका बोर्डाला आहे. कारण कोरोनामुळे श्रीलंका क्रिकेटचं संपूर्ण क्रिकेट कॅलेंडर यंदा उद्ध्वस्त झालं आहे.

 

खरंतर, 23 जुलै रोजी बांगलादेशदेखील श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे, पण कोरोना विषाणूमुळे बीसीसीआय आपली टीम श्रीलंकेत पाठवणार नाही. तर आम्ही सुरक्षित पद्धतीने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचं आयोजन करू असं श्रीलंका बोर्डानं म्हटलं होतं

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार