सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान मोदींनी बोलवली बैठक

केंद्रीय मंत्री, अधिकारी, निवडक डॉक्टर बैठकीत सहभागी होणार, देशभरातील करोना परिस्थितीचा आढावा घेणार

Sudarshan MH
  • Nov 27 2021 12:37PM

दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार B.1.1.529 समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्यानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर काही देशांमध्ये करोनाच्या नव्या विषाणूने बाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात करोना बाधित लोकांचा दैनंदिन आकडा हा खाली आलेला आहे, सर्व व्यवहार, सुरळित सुरु झालेले आहेत, लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, आंतरराष्ट्रीय विमान सेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत संबंधित केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे अधिकारी आणि निवडक डॉक्टर सहभागी होणार आहेत. देशातील सध्याची करोनाची परिस्थिती, करोनाचा नवा विषाणू B.1.1.529 चा संभाव्य धोका आणि यामुळे करायच्या उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा या बैठकीनंतर करोनाच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी काही नव्या सुचना, नियम सांगितले जातात का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार