सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसच्या अन्य नाराज आमदारांच्या संदर्भातही विकास निधीबाबत अन्याय

विकासकामांना निधी मिळण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असणाऱ्या ११ आमदारां

Aishwarya Dubey
  • Aug 26 2020 9:30AM

विकासकामांना निधी मिळण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असणाऱ्या ११ आमदारांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे नाराज झालेल्या आमदार कैलास गोरंटय़ाल यांची उपमुख्यमंत्र्यांनी  भेट घेतली.

आमदार गोरंटय़ाल यांच्या पत्नी जालना नगरपरिषदेच्या अध्यक्षा आहेत. नगरपरिषद काँग्रेसच्या ताब्यात असूनही निधी देताना महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्याय होत असल्याची गोरंटय़ाल यांची तक्रार होती. त्यांच्यासह काँग्रेसच्या ११ आमदारांनी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे नगरविकास मंत्र्यांच्या कानावर विकास निधीच्या संदर्भात आपले म्हणणे मांडले होते.

या संदर्भात आमदार गोरंटय़ाल यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. मंगळवारी त्यांनी भेट घेऊन संवाद साधला. जालना नगरपरिषदेच्या निधीबाबत होणारा अन्याय दूर करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेसच्या अन्य नाराज आमदारांच्या संदर्भातही विकास निधीबाबत अन्याय होणार नाही, असे त्यांनी सांगितले.  प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांसोबतही आपण जालना नगरपरिषदेच्या विकास निधीबाबत चर्चा केली असल्याचेही गोरंटय़ाल यांनी सांगितले. दरम्यान आमदार गोरंटय़ाल यांच्याबरोबर उपोषणाच्या तयारीत असणारे आमदार कोण याचीही चर्चा राज्यभर सुरू आहे. नांदेड जिल्ह्य़ातीस काही आमदारही निधी वाटपावरून नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार