सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महत्त्वाच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि 15 पक्षाचे नेते उपस्थित राहणार

कोरोनाच्या संकटावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक शुक्रवारी 3 वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डी एम के चे नेते एम. के.स्टेस्लिन  यांच्यासह 15 राजकीय पक्षातील नेते सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Snehal Joshi
  • May 20 2020 10:58AM

 सध्या या बैठकीत काँग्रेस 
कडुन कोणी प्रतिनिधी सहभागी होणार आहे का याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. या बैठकीत कोरोना  आणि लॉक डाऊन  काळात केंद्र सरकारकडून उचलण्यात आलेली पावले, योजना, पॅकेज यासंदर्भात चर्चा होईल तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना योग्य प्रतिसाद दिला जातो आहे का.... यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

 काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत ममता बॅनर्जी हजर होत्या. त्यावर केंद्राकडून भेदभाव होत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला होता. तसेच महाराष्ट्रात अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत अन्नपुरवठा सुरू आहे. मात्र आमच्याकडे केवळ तांदूळ आहे. डाळ, गहू नाहीत  ते केंद्र ने द्यावे अशी मागणी देखील उद्धव सरकारने केली होती.
 या बैठकीत  राज्यांनी केंद्राकडे केलेल्या मदत पॅकेज संदर्भात देखील चर्चा होईल असे बोलले जाते आहे. अनेक राज्यांनी मागणी करून देखील केंद्राकडून राज्यासाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली नाही.  पंतप्रधानांच्या घोषणेने संदर्भात चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार