सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले

देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे.

Aishwarya Dubey
  • Jul 19 2020 7:39PM

देशातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे. देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य आहे महाराष्ट्र (Maharashtra).

 

 

 

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे.जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी 8 हजार 348 नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा 11हजार 569वर पोहचला आहे. तर, राज्यात 3 लाख 937 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्ण निरोगी झाले आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली. शनिवारी 24 तासांत 2 लाख 59 हजार  848 रुग्णांची नोंद झाली. तर, शनिवारी अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून सर्वात जास्त रुग्णांनी नोंद झाली. याआधी शुक्रवारी 2 लाख 37 हजार 743 नवीन रुग्ण सापडले होते. 10 मेनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना मृतांची नोंद झाली आहे. 17 जुलै रोजी कोरोनानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7,360 पोहचली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार