सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाविद्यालयाचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्‍लेखनीय योगदान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महिला मह‍ाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचा शुभारंभ

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयाचे योगदान उल्‍लेखनीय राहिले आहे. आता महाविद्यालयाने कात टाकण्‍याची गरज असून पारंपरिक अभ्‍यासक्रमांची कास न धरता आधुनिक जगाला अनुसरून नवनवे अभ्‍यासक्रम सुरू करण्‍याची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Snehal Joshi .
  • Mar 27 2022 11:34PM

नागपूर, 27 मार्च
महिला महाविद्यालयाने पन्‍नास वर्षांच्‍या काळात महिला सक्षमीकरणाच्‍या क्षेत्रात महत्‍वाचे कार्य केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयाचे योगदान उल्‍लेखनीय राहिले आहे. आता महाविद्यालयाने कात टाकण्‍याची गरज असून पारंपरिक अभ्‍यासक्रमांची कास न धरता आधुनिक जगाला अनुसरून नवनवे अभ्‍यासक्रम सुरू करण्‍याची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

स्‍त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महिला महाव‍िद्यालय, नागपूरच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. 

नंदनवन येथील महाविद्यालयाच्‍या परिसरात झालेल्‍या या कार्यक्रमाला पूर्व नागपूरचे आमदार कृष्‍णाजी खोपडे यांच्‍यासह स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष रवींद्र फडणवीस, उपाध्‍यक्ष विजय घाटे, कोषाध्‍यक्ष प्रदीप मंडलेकर, सदस्‍य दिलीप खोडे, प्रशांत पाध्‍ये, अतुल मंडलेकर, महिला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. वंदना भागडीकर व सीमा फडणवीस यांची उपस्‍थ‍िती होती. याप्रसंगी माजी प्राचार्य मालिनी पांढरीपांडे, माजी उपप्राचार्य सरोज जोशी, माजी प्राचार्य व अहिल्‍याबाई होळक्‍र विद्यापीठाच्‍या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, निवृत्‍त अधिक्षक अशोक फुलाडी यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे सरोज जोशी उपस्‍थि‍त राहू शकल्‍या नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मुलाने हा पुरस्‍कार स्‍वीकारला.

संस्थेचे अध्‍यक्ष रवींद्र फडणवीस यांनी उत्‍तमरित्‍या कॉलेजची धुरा सांभाळली असून गडचिरोली जिल्‍ह्यातील मुलींना शिक्षण देऊन सामाजिक दायित्‍वही निभावले आहे. इतर शाळा, महाविद्यालयांनी त्‍यांचा आदर्श घ्‍यावा, असे आवाहन करताना नितीन गडकरी यांनी संस्‍था स्‍थापनेत महत्‍त्‍वपूर्ण योगदान देणा-या स्‍व. विजूभाऊ मंडलेकर व कृष्‍णराव भागडीकर यांच्‍याही कार्याचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. या सुवर्ण महोत्‍सवी वर्षात कृष्‍णराव भागडीकर यांच्‍या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ भवन उभारले जावे, अशी इच्‍छा व्‍यक्‍त करताना त्‍यांनी त्‍याकरिता आर्थिक सहकार्य करण्‍याचे आश्‍वासनही दिले. स्‍व. बहिणाबाई घाटे यांच्‍या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ विजय घाटे यांनी या भवनासाठी महाविद्यालयाला 51 हजार रुपयांची देणगी दिली. 

अध्‍यक्षीय भाषणात रवींद्र फडणवीस यांनी आजच्‍या शिक्षण पद्धतीत कसे आमूलाग्र परिवर्तन झाले आहे व शिक्षकांनी त्‍यानुसार कसे बदलले पाहिजे, यावर भाष्‍य केले. ते म्‍हणाले, 75 वर्षात शिक्षणाची दुर्गती झाली असून त्‍यात बदल करावेच लागणार आहेत. पण त्‍यापूर्वी लोकांच्‍या मनोवृत्‍तीमध्‍ये बदल करणे गरजेचे असून मुलांचे समुपदेशन करणेही तितकेच महत्‍वाचे आहे. ते झाले तरच उत्‍तम शिक्षण व्‍यवस्‍था उभी राहील, अशी पुष्‍टी त्‍यांनी जोडली. 

डॉ. मृणालिनी फडणवीस व मालिनी पांढरीपांडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. तत्‍पूर्वी, दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेच्‍या शिक्षिका उत्‍कर्षा महाजन व मिनल बावीस्‍कर यांनी शिक्षकांनी स्‍वागत गीत सादर केले. प्रास्‍ताविकातून डॉ. वंदना भागडीकर यांनी महाविद्यालयाचा स्‍त्री शिक्षणातील कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा घुशे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रविणा नागपूरकर यांनी केले. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार