सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांचा मास्क, टिव्हीवर चांदीचा मास्क पाहिल्या नंतर आपण ही घालू सोन्याचा मास्क

एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जनजीवन व्यस्त असून आज लोकांना घरात टाईमपास साठी काही उरलेले दिसुन येत नाही.

yogesh sharma
  • Aug 1 2020 10:34AM
योगेश शर्मा
बुलढाणा : एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जनजीवन व्यस्त असून आज लोकांना घरात टाईमपास साठी काही उरलेले दिसुन येत नाही. लॉक डाऊन मध्ये फावल्या वेळेत टीव्हीवर कार्यक्रम आणि बातम्या बघतांना कुणी चांदीचा मास्क बनवल्याचे समजला आणि बस याच वेळी आपणही आपल्यासाठी सोन्याचा मास्क बनवू अशी कल्पना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील दिपक वाघ यांच्या मनात आली. मनात आलेली गोष्ट घरच्यांना सांगितली आणि बस.. मास्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
.
दिपक वाघ हे मूळचे चिखली तालुक्यातील गोद्री या गावचे रहिवाशी आहेत, हल्ली मुक्काम त्यांचा चिखली शहरात आहे. ग्रामीण भागातून शहरात तारुण्य वयात आलेला हा तरुण रस्त्यावर गाण्याचे कैसेट पलंगावर बसून विकायचे. चार टिनाच्या घरात राहायचे. लग्नाच हट्ट घरच्यांनी धरल्यावर वडिलांकडून चार टिनाची खोली अगोदर तयार करून घ्या मंगच लग्न करेन, आणि हमाली करणारे त्यांच्या वडिलांनी मजुरी करत मुलाचा हट्ट पूर्ण ही केला. हट्ट करायचे एकच कारण की, लग्नानंतर माझं आणि माझ्या परिवाराच ओझं मजुरी करणाऱ्या बापावर येऊ नये.
जसे काम आले केलेत आणि आज ग्रामीण भागातून मोलमजुरी साठी चिखली शहराच्या रस्त्यावर फिरणारा हा तरुण आज चक्क सोन्याचा मास्क घालून फिरतोय. व्यक्ती तोच रस्ते ही तेच फक्त बदलली ती परिस्थिती.. 
आज दीपक वाघ यांच्या सोन्याच्या मास्कची चर्चा सर्वदूर झाली असून मला अगोदर पासूनच सोन्याची आवड असल्याने मी हे मास्क तयार करून घेतले. पुढे मी सोन्याचा शर्ट बनवून घालणार हे ही आवर्जून सांगितले.
दिपक वाघ ने आपल्या मित्राच्या दुकानातून हे मास्क तयार करून घेतले आहे. त्यांचे मित्र प्रसाद काछवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार  हा मास्क चा एकूण वजन ६५ ग्राम असून आज रोजी त्याची बाजारभावाप्रमाणे जवळपास ३ लाख ७० हजार रुपये किंमत होते..
.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार