सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नरेंद्र मोदी यांचं भावुक भाषण;रितेश देशमुखनंही केलं कौतुक

गुलाम नबी आझाद यांच्या निरोपावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण व्हायरल झालं. सेलिब्रिटिजनंही ते उचलून धरलं आहे.

Sudarshan MH
  • Feb 10 2021 10:25AM

राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औचित्यानं लहानसं भाषण दिलं. जुन्या आठवणी सांगताना मोदी भावूकही झाले. हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. रितेश देशमुखनंही आता या भाषणाबाबत ट्विट केलं आहे.

अनेकजण नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं कौतुक करत आहेत. यात अभिनेता रितेश देशमुखचीही भर पडली आहे. रितेशनं मोदी यांच्या भाषणाबाबत ट्विट केलं आहे. त्यात रितेश म्हणतो, 'गुलाम नबी आझाद साहेबांना राज्यसभेत निरोप देताना मोदी यांनी भाषण केलं. ते ऐकून मी खरंच भारावून गेलो.' हे ट्विट खूप व्हायरल झालं आहे. अनेक सोशल मीडिया युजर विविध कमेंट्स करत आहेत.

 

 

 

रितेशनं नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना गुलाम नबी आझाद यांच्याबाबत म्हटलं, की गुलाम नबी आझाद त्या रात्री एअरपोर्टवर होते. त्यांनी मला फोन केला आणि अगदी कुटुंबातल्या सदस्याची चिंता करावी तशी ते माझी चिंता करत होते. सत्ता आयुष्यात येत जात राहते मात्र तिला पचवायचं कसं हे गुलामजींकडून शिकलं पाहिजे. तो माझ्यासाठी अतिशय हळवा क्षण होता.

 

 

 

गुलाम नबी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मीसुद्धा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही दोघेही एकमेकांच्या अतिशय जवळ होतो. एकदा गुजरातच्या काही प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 8 लोक मारले गेले. सर्वात आधी मला फोन आला तो गुलाम नबी आझाद यांचा. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. तेव्हा प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना म्हणालो, की मृतदेह आणण्यासाठी विमान मिळालं तर चांगलं होईल. त्यांनी म्हणलं, तुम्ही चिंता करू नका. मी व्यवस्था करतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार