सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त

आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही आदिवासी समाजातील तरुण गुलामीचे जीवन जगतात याची खंत वाटते.-श्री.विवेक भाऊ पंडित ।

Aishwarya Dubey
  • Jul 29 2020 6:14PM
भिवंडी -  भिवंडी तालुक्यातील पाये नाईकपाडा याठिकाणी कोंड्या गोविंद भोईर यांना   एकूण 3 मुले,1 मुलगी असे एकूण 4 मुले आहेत.यातील राजेश भोईर वय-24 वर्ष,भिमा भोईर वय-22 वर्ष या दोघा भावांच्या 29/5/2018 रोजी लग्नासाठी खार्डी गावातील निलेश तांगडी या शेठणे खर्च केला होता.सदर लग्नासाठी 1,19,690/रु.खर्च झाल्याचे एका कागदावर लिहून दिले होते.लग्नाच्या काही दिवसानी दोघा भावांनी खार्डी येथील निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली.यावेळी आठवड्याला प्रत्येकी 1000 रु.दोघांना दिले जायचे.दोघा भावांना घरी जाण्यासाठी हिरो कंपनीची पॅशन प्रो.ही गाडी घेऊन दिली होती.त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कट केले जायचे.कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशोब केलेला नव्हता.सर्व्हिस सेन्टरवर काम नसले की शेठ त्यांच्याकडून शेती किंवा इतर कुठलेही कामे करून घ्यायचा.सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाव हे घरातील आवणीचे काम करत होते.यावेळी सतत निलेश तांगडी यांनी फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला असा तगादा लावला होता.घरच्या आवणीचे काम आटोपून येतो.परंतु शेठ काही ऐकत नव्हता.दोघा भावांनी शेठला दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले.याचा राग मनात ठेवून निलेश तांगडी यांनी दोघा भावांना शिवीगाळ व जिवे-ठार मारण्याची धमकी दिली.तसेच माझे व्याजासाहित 3,00,000/ रु.झाले आहेत.ते एका महिन्यात मला द्या.यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून गुरुवारी भिवंडी तालुका पोलीस स्टेशन येथे गेले.परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य न ओळखता साधी NC नोंदवून घेतली.पोलिस स्टेशनला गेले याचा राग मनात ठेवून सदर कुटुंबावर निलेश तांगडी कुटुंबाचा अधिक दबाव वाढत होता.या घटनेची माहिती मिळताच आज श्रमजीवी संघटना भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे संस्थापक मान.श्री.विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वेठबिगार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली.सदर गुन्हा दाखल करताना तालुका पोलिस स्टेशनमध्ये NC दाखल केली आहे.या NC चा तपास करणारे API राठोड यांनी आरोपी व फिर्यादी यांना ठाणे अंमलदाराच्या केबिनमध्ये एकत्र बसवून चौकशी करण्यास सुरुवात केली.याचा जाब भिवंडी तालुक्याचे अध्यक्ष श्री.सागर भाऊ देसक,सचिव मोतीराम भाऊ नामकुडा यांनी  विचारला असता कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरून 353 चा गुन्हा दाखल करतो.असे सांगितल्याने चिडलेल्या कार्यकर्त्यानी तालुका पोलिस स्टेशनमध्ये संघटनेच्या शिस्तीप्रमाणे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा.याचा आग्रह धरला.या घटलेल्या प्रसंगाची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.राम भालसिंग यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.व तात्काळ गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली.जमलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना घाबरून API राठोड हे पळून गेले.भिवंडीचे तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी यांनी दोघा भावांना मुक्तीचे दाखले देऊन धीर दिला.
हा गुन्हा दाखल करण्यासाठी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भाऊ भोईर,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ सापटे,ठाणे जिल्हा शेतकरी घटक प्रमुख संगिता ताई भोमटे,ठाणे जिल्हा महिला घटक प्रमुख जया ताई पारधी,
भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनिल लोणे,भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष केशव पारधी यांनी मदत केली.तसेच भिवंडी तालुका शहर अध्यक्ष सागर भाऊ देसक,तालुका सचिव मोतीराम नामकुडा, कातकरी घटक प्रमुख गुरुनाथ वाघे,भिवंडी शहर उपप्रमुख महेंद्र निरगुडा, युवक उपप्रमुख किशोर हुमणे हे शेवटपर्यंत उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार