सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वारकरी संप्रदायाने काढला मोर्चा विविध मागन्याचे पालघरच्या जिल्हाधिकारीयांना निवेदन

आषाढी एकादशीला पंढरपूरची वारकरी संप्रदायची वारीसाठी शासनाने निबंध लावताना बंड्या तात्या कराडकर यांना अटक करून स्थानबद्ध केल्याप्रकरणी निषेध नोंदवत त्यांची तात्काळ मुक्तता करावी

Sudarshan MH
  • Jul 20 2021 9:25AM
पालघर - आषाढी एकादशीला पंढरपूरची वारकरी संप्रदायची वारीसाठी शासनाने निबंध लावताना बंड्या तात्या कराडकर यांना अटक करून स्थानबद्ध केल्याप्रकरणी निषेध नोंदवत त्यांची तात्काळ मुक्तता करावी , यासाठी वारकरी संप्रदाय बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्या जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केल्या . शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला पंढरपूरची वारी सुरू करण्यासाठी तसेच बंड्या तात्या कराडकर यांची तात्काळ मुक्तता करण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले . या निवेदनात पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचे भर रस्त्यात भगवे कपडे वस्त्रे उतरवायला लावले . तसेच वारकरी संप्रदयाची भगवी पताका काढायला लावल्याने वारकरी संप्रदायाने संबंधित पोलीस प्रशासनाचा निषेध करत केला ज्या वारकऱ्यांना जागोजागी ताब्यात घेतले आहे.त्यांची तात्काळ मुक्तता करून ५० वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी द्यावी . यासाठी टाळ मृदुंग भजन करत हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढला . वारकरी संप्रदाय याकडून कोहरा महाराज तसेच प्रदीप महाराज यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदचे मुकेश दुबे तसेच बजरंग दलाकडून चंदन सिंग यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता . तर पालघरच्या नगरसेवक अरुण माने , अलका राजपूत व इतर कार्यकर्ते या मोर्चासाठी सहभागी झाले होते . पंढरपुरात लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम त्याच बरोबर पंढरपुरातील पोटनिवडणूक या काळात करुणा संकट नव्हते का ? असा प्रश्न वारकरी संप्रदायाने विचारला आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार