सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*पॅकेजचं काय झालं? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल*

राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना महाविकास आघाडी सरकारनं फेरीवाले व रिक्षावाल्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज अद्याप मिळालं नसल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

Sudarshan MH
  • Apr 30 2021 4:15PM

राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना महाविकास आघाडी सरकारनं फेरीवाले व रिक्षावाल्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज अद्याप मिळालं नसल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा जगायचं कसं? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला, त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा?,' असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारनं पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. यातील किती जणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा?,' अशी विचारणा उपाध्ये यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार