सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खेडदिगरच्या कथित जुगार अड्यावरील धाडीचे रहस्य काय? युवकाच्या मृत्यूशी धागे जोडणाऱ्या लोकचर्चेला आले उधाण

युवकाच्या मृत्यूशी धागे जोडणाऱ्या लोकचर्चेला आले उधाण

Nandurbar MH
  • Jan 18 2021 9:48AM
सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी. 84217 32333
नंदुरबार - महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील जुगारअड्यावरील कथित धाड सध्या बहुचर्चित बनली आहे. ईतकेच नव्हे तर एका युवकाच्या मृत्यूशी या धाडीचे धागे जोडले जाणारी चर्चा जोरदार सुरू आहे. यामुळे खेडदिगरच्या जुगार अड्ड्यावरील छाप्याचे रहस्य काय? याची उत्सुकता लोकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
    नंदुरबार जिल्ह्यालगतच्या गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमा अनेक वर्षांपासून अंतर्राज्यीय गुन्हेगारीचे केंद्र बनले आहेत. गुरांची तस्करी, गोमांस तस्करी, मद्य तस्करी, लाकूड तस्करी, गुटका तस्करी आणि जुगाराचे अड्डे यांचे प्रस्थ चांगलेच वाढले आहे. शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या खेडदिगरचा भाग सुद्धा यासाठी चर्चेत राहतो. दोन महिन्यांपूर्वी शहादा येथे अचानक पोलीस पथकाने छापा टाकून एका मोठ्या जुगार अड्डा चा पर्दाफाश केला होता. अनेक उच्चपदस्थ प्रतिष्ठित मानली जाणारी मंडळी त्यात अडकली होती. धुळे नंदुरबार आणि पानसेमल पर्यंतचे राजकीय कनेक्शन आढळून आले होते. अशातच आता खेड दिगर येथील जुगार अड्ड्यावरील एक छापा चर्चेत आहे. पोलीस रेकॉर्डवर हा छापा आलेला नाही तसेच पत्रकारांसाठी काढल्या जाणाऱ्या प्रश्न मध्ये सुद्धा प्रेस नोट मध्ये सुद्धा त्याची माहिती येणार नाही याची खबरदारी घेतली गेल्याचे दिसत आहे. परिणामी या छापेमारी ची अधिकृतता अधांतरीत आहे. यामागचे रहस्य काय? असा प्रश्न सध्या लोकांमधून केला जात आहे.
त्या रात्री घडलेली घटना सस्पेन्स असली तरी त्याची वाच्यता आता होऊ लागली आहे. पोलिसांनी जुगार अड्यावर धाड टाकण्याचा घाव आणि बिथरलेल्या एका युवकाने बिल्डिंगवरून मारलेली उडी, याचे कथानक चौकांमधून चर्चीले जात आहे. हा योगायोग म्हटला जात असला तरी त्या युवकाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाला दडपले जात असल्याची कुजबूज वाढली आहे. हा संशयास्पद मृत्यू दडपण्याचा जो प्रयत्न होतोय तो नक्कीच संशय वाढवणारा आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीवर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे. प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून 'तेरी भी चूप अन मेरी भी चूप असा प्रकार सुरू आहे. तसे करण्यात यशस्वी झाले असले तरी टोपलीखाली कोंबडे कितीही झाकले तरी तो एक दिवस बांग नक्कीच देत असतो, हे कटू सत्य कुणीही नाकारू शकत नाही. दोंडाईचा येथील युवकाचे मृत्यू प्रकरण यासाठी बोलके उदाहरण आहे. अपघाताचा बनाव रचून सुद्धा अखेरीस त्याला मारणारे उघडेे पडलेच होते. खेड दिगर चे प्रकरण त्याच वळणानेे जाईल की काय अशी शंका लोकांना वाटू लागली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार