सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंदिर वहीं बनायेंगे

आज विश्वसंवाद केंद्राद्वारे मंदिर वहीं बनायेंगे ह्या राम मंदिर आंदोलना वरील गीतांचे you tube च्या माध्यमातून पुनः प्रसारण करण्यात आले.

सुनील पाळधीकर
  • Aug 5 2020 11:06PM
आज विश्वसंवाद केंद्राद्वारे मंदिर वहीं बनायेंगे ह्या राम मंदिर आंदोलना वरील गीतांचे you tube च्या माध्यमातून पुनः प्रसारण करण्यात आले. 1991 साली निर्माण झालेल्या ह्या गीतांचा आज देशभर आवाज दुमदुमतो आहे. 29 वर्षा पूर्वीचा प्रसंग आजही डोळ्या समोर तरळतो आहे. राम जन्म भुमीचे आंदोलन विश्व हिंदू परिषदे च्या माध्यमातून सुरू झाले होते. कार सेवकां च्या तुकड्या वरचेवर रवाना होतं होत्या. हजारो तरुण अयोध्येत दाखल होतं होते. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग ह्यांचं राज्य होतं. अचानक कार सेवकां वर गोळीबार करण्यात आला कोठारी बंधू आणि असंख्य कारसेवक मृत्यू मुखी पडले. देशात तरुणां मध्ये जणू राम मंदिर निर्माण आंदोलनाचा ज्वर पसरला. नागपुरातले कवी मुकुंद पुल्लीवार यांनी जोशपूर्ण 12 गीतं लिहिली. त्यांच्या डोळ्यासमोर ती गाणी गाण्यासाठी कांही नावं होती त्यात जेष्ठ गायक शाम देशपांडे आणि स्नेहल पाळधीकर निश्चित होते. अजून दोन गायक घ्यायचे असेही मनात होते. श्री. गणेशा करायचा होता. रविवार चा दिवस होता सकाळी सकाळी मुकुंदराव आणि शाम माझ्या कडे आले. स्नेहलशी गाण्या संबंधी बोलणे झाल्या नंतर आम्ही भैय्याजी ( पुरुषोत्तम) सामक ह्यांच्या कडे गेलो. भैय्याजी ह्यांनी मुकुंदरावांच्या गीतांना आधीही चाली आणि संगीत दिले होते. त्यांनी जबाबदारी स्वीकारली येवढंच नव्हे तर कामाला सुरवात ही केली. सरिता भावे ह्या गायिका नागपुरात नुकत्याच आल्या होत्या. त्यांना विचारणा करण्यात आली, त्यांनी ह्या प्रकल्पात सहभागी होण्यास संमती दिली. त्याच प्रमाणे संघ गीत गायक अशोक कानगो आमच्यात सहभागी झाले. गायकांनी आपापली गाणी बसविण्यास सुरवात केली. कार्यक्रम जाहीर व्हावा आणि भव्य व्हावा अशी स्व.मुकुंदरावांची इच्छा होती. गाणी छान बसली होती. गाण्यांची ध्वनी फीत काढावी अशी सूचना पण आली. जाहीर कार्यक्रम आणि ध्वनिफित ह्यांची जबाबदारी मी स्वीकारली. स्व. दत्ताजी डीडोळकर ह्यांच्या स्मरणार्थ एखादा भव्य कार्यक्रम करावा असं मनात होतंच. नागपुरात त्यावेळी मोठा आणि नवीन असा वसंतराव देशपांडे हॉल तयार झाला होता. तयारी साठी सोबत माझा मित्र चारुदत्त सावजी आणि अनंतराव मुळे मदतीला होते. कामांची लांबलचक यादी होती. जाहीर कार्यक्रमासाठी २ ८ मार्च 1991 ही तारीख निश्चित करण्यात आली. तेवढ्यातच लोक सभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पोलीस परवानगी मिळेल की नाही अशी शंका होती. ईश्वरी कार्य होते, मदतीला प्रभू राम धाऊन आले. परवानगी काही अटींसह मिळाली. वाद्य , संगीत साथीदार ही जबाबदारी शाम देशपांडे नी स्वीकारली. अनंतराव मुळे सदैव माझ्या सोबत असायचे.जाहिरात मिळविणे ह्या कामात चारुदत्त सावजी आणि अनिल सांबरे सोबत होते. मोठ मोठ्या जाहिराती देण्यात आल्या. ध्वनी मूद्रणा च काम सुरू झालं. प्रा. अरविंद (बल्लुजी) खांडेकर ह्यांनी आपल्या मधाळ आवाजात निवेदन केलं शिवाय कार्यक्रमाचं संचालन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी होते तर प्रमुख अतिथि जाल पी. गीमी होते.कार्यक्रमाच्या दिवशीच ध्वनिफित तयार असावी असा प्रयत्न होता. ध्वनिफित निर्मिती मध्ये अनिल आणि विश्वास सहस्रभोजनी आणि स्व. विनायक राव चिंचवडकर यांनी आर्थिक मदत केली. नागपूर ला Musireka स्टुडिओत रेकॉर्डिंग करण्यात आले. कार्यक्रम खूपच भव्य झाला. गाणी खूप गाजली. BJP नी निवडणूक प्रचारात गाण्यांचा उपयोग केला. राम मंदिर निर्माण कार्याच्या ह्या यज्ञात आमच्याही समिधा अर्पित झाल्या. आज मुकुंद राव पुल्लीवार, भैय्याजी सामक, अशोक कानगो आणि अनंत राव मुळे भूमी पूजना चा सोहळा पाहण्यास हयात नाहीत, पण त्यांना समाधान नक्कीच लाभलं असेल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार