सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गॅस टँकरची टेम्पोला धडक टमाट्यांचा टेम्पो उलटला

नवापूर तालुक्यातील विसरवाडी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री आयशर टेम्पो व गॅस टँकरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला.

Nandurbar MH
  • Sep 16 2021 4:47PM

नवापूर तालुक्यातील विसरवाडी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री आयशर टेम्पो व गॅस टँकरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे, तर दुसरा अपघात नंदुरबार नवापूर रस्त्यावरील मोठे कडवन गावाजवळ भरधाव वेगात येणारा टेम्पो उलटला.

टेम्पोत भरलेले टोमॅटो रस्त्यावर पसरल्याने व्यापाराचे मोठे नुकसान झाले.

महामार्गावर विसरवाडीनजीक रात्री टेम्पो व गॅस टँकरची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, टेम्पोचालकाचा पाय अडकल्याने बाहेर काढणे मोठे जिकिरीचे जात होते. स्थानिकांनी गॅस कटरच्या साहाय्याने चालकाला बाहेर काढत उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गॅस टँकर सुरतहून धुळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली.

गॅस टँकर भरलेला होता. सुदैवाने कुठलीही दुर्घटना झाली नाही. समोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला पेट्रोल पंप आहेत. घटनास्थळी विसरवाडी पोलिसांनी पंचनामा करून, अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दुसऱ्या घटनेत नंदुरबार तालुक्यातील बलसाने येथून नवापूर येथे विक्रीसाठी टोमॅटो भरून घेऊन जाणारा टेम्पो (एमएच ०४ जी.आर. १३१८) भरधाव येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने मोठे कडवान गावाजवळ उलटला. त्यात वाहनाने व टोमॅटो यांचे मोठे नुकसान झाले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार