सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका

ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु,

Snehal Joshi .
  • Dec 16 2020 12:09AM
मुंबईतील अधिवेशनाचा आज दुसरा व अंतिम दिवस दिवस होता. यावेळी विरोधकांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं असून ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. “ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, आम्ही मान्य करणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणती स्थगिती आली नाही. पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्या मराठा तरुणांवर सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारनेच कोर्टात आम्ही भरती करणार नसल्याचं सांगितलं. कोर्टाने काहीही विचारलेलं नसताना राज्य सरकारने सांगून टाकलं. यामुळेच प्रक्रिया पूर्ण झालेले मराठा तरुण आज बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही,” असे स्पष्ट विरोधी पक्षनेते फडणवीसांनी यावेळी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार