सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*दर आठवड्याला संवाद साधून वाशीम-अकोला जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावणार....डॉ.नितीन राऊत*

वाशीम-अकोला जिल्ह्याच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी एकत्रितरित्या वीज प्रश्न, विकास कामे आणि स्थानिक प्रश्नांची यादी तयार करून पाठवावी, जेणेकरून जनतेचे प्रश्न मार्गी लावता येतील असे मत वाशीम-अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ. नितीन राउत यांनी व्यक्त केले.

Snehal Joshi .
  • Jul 25 2020 8:27PM
वाशीम-अकोला जिल्ह्याच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी एकत्रितरित्या वीज प्रश्न, विकास कामे आणि स्थानिक प्रश्नांची यादी तयार करून पाठवावी, जेणेकरून जनतेचे प्रश्न मार्गी लावता येतील असे मत वाशीम-अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ. नितीन राउत यांनी व्यक्त केले. वाशीम-अकोला जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या समस्त पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून डॉ. राऊत यांनी दोन्ही जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या. यामध्ये वाशीम, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, मानोरा, अकोला मुर्तीजापुर, आकोट, बाळापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातुर इत्यादी भागातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ. नितीन राऊत म्हणाले कि, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू आणि वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे कोविड काळात उत्तमरीत्या काम करीत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. बच्चू कडू म्हणाले कि, कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील समस्यांबाबत मला निवेदन द्यावे जेणेकरून स्वतंत्र बैठक लावून प्रश्न मार्गी लागतील. कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला. डॉ.नितीन राउत यांनी लॉकडाऊन कालावधीत गोर-गरीब निराधार व्यक्तींना अन्नधान्य कीट वितरीत केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. व्ही.सी.मध्ये अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चुभाऊ कडू आणि वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, रिसोडचे आमदार अमित झनक तर जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि दिलीप सरनाईक तर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद-पंचायत समिती सभापती तसेच प्रमुख पदाधिकारी महादेव साळुंखे, इफ्तिखार पटेल, रमेश पाटील, हमीद शेख, सलीम जहागीरदार, मिलिंद पाकधने, मिर्झा, दिलीप भोजराज, राजू चौधरी, प्रकाश वायभासे, बरखा बेग, जगदीश गायकवाड, प्रशांत, सारंग मालानी, सुनील घावत पाटील, डाखोळे, अजय तातोड, खतीब आयनुद्दीन, एजाज खान, प्रकाश वाकोडे, मेह्फुज खान, सय्यद जहांगीर, बाळासाहेब बाजर, उर्मिला दाबेराव, बबन चौधरी, प्रीतम खुले, संतोष दिवटे यांनी आपल्या परिसरातील ज्वलंत समस्या मांडल्या. संवादात्मक कार्यक्रमात सर्वप्रथम दोन्ही जिल्ह्यातील कोविड विषयक कामे आणि रुग्णांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये कोविड रुग्ण संख्या, तपासण्या, पी.पी.ई.कीट, अन्नधान्य वितरणाबाबत माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायतीत कोणाला प्रशासक म्हणून नेमावे, शेत कामाला रोजगार हमी योजनेची जोड द्यावी, कायदा व सुव्यवस्था, शासकीय रिक्त पदभरती, पोलीस निरीक्षकाची पदे रिक्त आहेत ती भरण्यात यावी. व्ही.सी.मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली त्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा गावपातळीवर अधिक समन्वय वाढावा, महानगर पालिका, नगर परिषदेला निधी देण्यात यावा, विकास कामांना निधी मिळावा. शासकीय समित्यांवर पदाधिकाऱ्यांची निवड व्हावी आणि अकोल्यात कॉंग्रेस पक्षाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. सोबतच, वीज विषयक प्रश्ने, देखभाल दुरुस्ती, डी.पी.ची कामे, कृषी पंप वीज जोडणी, अकोला-निंबा-पारस-बाळापुर रस्ता दुरुस्ती, खत पुरवठा, बार्शी टाकळी पाणी पुरवठा प्रस्ताव, अकोला सुपर स्पेशालिटी इस्पितळाला कर्मचारीवृंद, तेल्हारा तहसील कार्यालय इमारत उद्घाटन इत्यादीबाबत मान्यवरांचे लक्ष आकर्षित करण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार