सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नवे कोविड सेंटर्स*

भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवली या भागात दोन कोविड केअर सेंटर्स प्रारंभ करण्यात आले.

Sudarshan MH
  • Apr 26 2021 6:19PM


*- देवेंद्र फडणवीस यांनी केले उदघाटन*
*- एकूण 150 ऑक्सिजनयुक्त खाटा मुंबईकरांच्या सेवेत*
*- गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचेही वाटप*

मुंबई, 26 एप्रिल
भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवली या भागात दोन कोविड केअर सेंटर्स प्रारंभ करण्यात आले. या दोन्ही सेंटर्सचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. यामुळे मुंबईकरांच्या सेवेत आणखी 150 ऑक्सिजनयुक्त खाटा दाखल झाल्या आहेत.

अंधेरी पूर्व येथे कोळडोंगरी येथे रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि केशव सृष्टी ट्रस्टच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. इस्कॉन आणि इतरही संस्था सुद्धा यात विविध मदत देत सहभागी झाल्या आहेत. आज लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा दिलासा यातून मिळणार आहे. नित्यानंद महापालिका शाळा, अंधेरी पूर्व येथे स्थापन करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये 24 बाय 7 डॉक्टर्स आणि वैद्यकीय चमू आहेत. ऑक्सिजन, रूग्णवाहिका, समुपदेशन आणि इतरही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संजय पांडे यांच्यासह इतरही यावेळी उपस्थित होते. 

भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. भुराभाई आरोग्य भवन, येथे या कोविड सेंटरमध्ये 117 ऑक्सिजन बेड्स असून, ते आता मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. या कोविड सेंटरला पॅथॉलॉजी आणि डिजिटल एक्सरे सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उदघाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, अतुल भातखळकर, भाई गिरकर, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक सुरेशजी भगेरिया इत्यादी यावेळी उपस्थित होते.

तिसर्‍या एका कार्यक्रमात भाजपाचे मुरजी पटेल यांच्या जीवनज्योत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रूग्णालयात दाखल होईस्तोवर गरजू रूग्णांना प्रथमोपचार म्हणून याचा वापर करता येतो. या संस्थेतर्फे गणेश मंडळ, सोसायट्या यांना मोफत सॅनेटायझर किट, ऑक्सिमीटर्स, तापमान मोजण्याचे उपकरण सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचेही प्रतिनिधिक वितरण देवेंद्र फडणवीस यांनी केले. सध्याच्या या संकटात मानवतेची सेवा हेच सर्वांचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. इतरांनी सुद्धा अशा अनेक उपक्रमांतून समाजासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

चौकट...

*संकटसमयी कांगावेखोरांनी दररोज लोकांना भ्रमित करू नये*

केंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचे मोफत लसीकरण होणार आहे, ही बाब कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून स्पष्ट केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. तथापि कोणत्या राज्याला या अभियानाला आणखी गती द्यायची असेल तर राज्यांना लसी विकत घेण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे. मात्र, लसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. त्यामुळेच कुणी कोणत्या घोषणा करतात आणि नंतर ट्विट डिलीट करतात. आज राज्याला सर्वाधिक 4.35 लाख रेमडेसिवीर मिळाल्या. 1750 मेट्रीक टन इतका सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला. या संकटात तुलना करणे योग्य नाही. पण, ज्यांना तीच भाषा समजते, त्यांना सांगायचे तर इतर राज्यांपेक्षा हा दुप्पट कोटा आहे. 1100 हून अधिक व्हेंटिलेटर्स सुद्धा नव्याने महाराष्ट्राला मिळत आहेत. अशा संकटात कांगावेखोरांनी या संकटसमयी लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार