सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्तर महाराष्ट्रात एकमेव नंदुरबार जिल्ह्यात आजपासून रोज शाळा

नंदुरबार जिल्ह्यात आजपासून रोज शाळा

Nandurbar MH
  • Nov 23 2020 10:46AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - दक्षता म्हणून जिल्ह्यातील 3500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेतली असून आतापर्यंत 20 हून अधिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तथापि सर्व दक्षता घेत जिल्ह्यातील इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून नियमित सुरू केले जाणार आहेत.
नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नंदुरबार शहरातील शाळा क्रमांक 1 येथे स्वँब तपासणीची सोय करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून रोज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासणी करून घेण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरूना चाचणी झालेल्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची घटलेली आकडेवारी अचानक वाढलेली दिसू लागली आहे. दिवाळी आटोपून परभणी जिल्ह्यातून परतलेल्यांनी सुध्दा तपासणीसाठी गर्दी केली आहे. परंतु तुलनेने नंदुरबार जिल्ह्यात कोरोना वाढीचे लक्षण अद्याप उमटलेले नाही. दरम्यान नियमित शालेय वर्ग सुरुु करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत तपासणी करून घेतलेल्या पैकी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून पंचवीस व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांनी स्वतःला  क्वारंटाईन करून घेतले आहे. उर्वरित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून नियमित सुरू होणाऱ्या शालेय वर्ग हाताळणीसाठी सज्ज झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात चौऱ्याहत्तर आश्रम शाळा 288 माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय मिळून 417 शाळा आहेत. 3 हजार 500 हून अधिक शिक्षक कर्मचारी आहेत. जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कदम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहावे म्हणून एकूण संख्याच्या  निम्मे विद्यार्थी आज आणि निम्मे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत सॅनेटरी व्यवस्था राहणार आहे. मुख्याध्यापकांच्या आढावा बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत; असेही कदम यांनीी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार