सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाप झाला वैरी स्वतच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमी बापाला चाकण पोलिसांनी केलं गजाआड.....

चाकण : भोसे गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या स्वाच्या पती विरोधात पोटच्या मुलीवर वाईट नजर

Sudarshan MH
  • Mar 13 2021 11:45AM
 
 
प्रतिनिधी:- दीपक चव्हाण पुणे
 
चाकण : भोसे गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या स्वाच्या पती विरोधात पोटच्या मुलीवर वाईट नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून. ही महिला तिचा पती एक मुलगी व एका मुलासह खेड तालुक्यातील भोसे या गावात वास्तव्यास असून वाईट नजरेने मिठी मारली. याबाबत सुरवातीला तिने दुर्लक्ष केले मात्र यानंतर तिच्या नऊ वर्षीय मुलीने तिच्या नराधम बापाने तिच्याशी शारीरिक चाळे केले असल्याचे आई ला सांगितले याबाबत आईने तिच्या पतीला जाब विचारला असता जास्त शहाणपणा करू नको असे म्हणाला व त्यांच्यात  बाचाबाची झाली. 
 
 
  काल दिनांक ११/०३/२०२१ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्याच्या स्वतःच्या राहत्या घरात स्वतःच्या नऊ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार वारंवार झाल्याने तिच्या आईने चैतन्य महिला मंडळ मोशी येथे याबाबतची हकीगत पोचवली. सदर संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याप्रकरणी त्वरित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची विनंती केली त्यानुसार हा गुन्हा पीडितेने व तिच्या आईने दाखल केला आहे.
 
 
 
याप्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडे हे करत आहेत. आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या बचावात आरोपीच्या वकिलांनी नवरा-बायकोच्या भांडणातून सदरची खोटी फिर्याद दाखल केली असल्याचा युक्तिवाद केला. तर सरकारी वकील सौ. देशपांडे मॅडम यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून प्रत्यक्ष साक्षीदार मिळवायचे असल्याने तसेच पुढील तपासकामाकामी पोलीस कोठडीची मागणी केली.
 
 
स्वतःच्या मुलीवरच अतिप्रसंग करणाऱ्या अशा नराधमांना न्याय व्यवस्थेतून काय शिक्षा व्हायची ती होईलच मात्र अशा घटना समाजव्यवस्थेवरती देखील दूरगामी परिणाम करत असतात त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्वाची ठरते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार