सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

28 व 29 रोजी नांदेड जिल्ह्यातील सरपंच आरक्षणाच्या सोडती त्या त्या तालुक्यात होणार

नांदेड जिल्ह्यातील सरपंच आरक्षणाच्या सोडती त्या त्या तालुक्यात होणार

Sudarshan MH
  • Jan 22 2021 6:41AM
 
नांदेड दि.२२(अरविंद जाधव) नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका व त्यांची मतमोजणी संपल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 28 व 29 जानेवारी रोजी या आरक्षणाची सोडत त्या त्या तालुक्यांच्या ठिकाणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका व मतमोजणी पार पडल्यानंतर आता सर्वांना सरपंच व उपसरपंच पदाचे आरक्षण कधी होणार याबाबत उत्सुकता लागली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आज याबाबतची अधिसूचना जाहीर करुन सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नांदेड तालुक्यातील आरक्षण 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय नांदेड येथे, अर्धापूर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, भोकर 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, मुदखेड 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, हदगाव 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, हिमायतनगर 29 जानेवारी सकाळी 11 वाजता,
किनवट 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, माहूर 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, धर्माबाद 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, उमरी 29 जानेवारी सकाळी 11 वाजता, बिलोली 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, नायगाव 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, देगलूर 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, मुखेड 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, कंधार 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, लोहा 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहे. त्या त्या तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आणि खुला प्रवर्ग या प्रमाणे हे आरक्षण निश्चित करण्याचे अधिकारी त्या त्या तहसीलदारांना प्रदान करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार