सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शासकीय जमीनीचे भाडे थकविले!बारा संस्थांची चौकशी सुरु

थकविले!बारा संस्थांची चौकशी सुरु

Sudarshan MH
  • Mar 10 2021 7:27AM
अहमदनगर
    
नागपूर शहरात एक रुपया लीजवर शासनाकडून सामाजिक कामांसाठी जागा घेऊन ज्या बारा संस्थांनी शासकीय जमिनीचे भाडे थकविले आहे, त्यांची उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली. नागपूर शहरातील शासकीय जमिनींचे भाडे संस्थांनी थकविल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
 
 
शासकीय जमिनीचे भाडे थकविणाऱ्या बारा संस्थांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित संस्थांबाबत भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीनुसार जमीन वापराबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
 
मुंबईतील गोरक्षक मंडळाने गाय चरणसाठी जी शासकीय जमीन घेतली होती त्यामध्ये गैरप्रकार झाले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही महसूलमंत्र्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार